‘त्या’ शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:39 AM2018-05-04T00:39:14+5:302018-05-04T00:39:14+5:30
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
कापडसिंगी येथील संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय व रेखेबाबा माध्यमिक विद्यालयातून आॅनलाईन अर्ज केल्याने तब्बल ६९८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला अचानक अवतरले होते. या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण तर वयोवृद्धही होते. नियमित विद्यार्थी असणाºयांपैकी कोणीच वाटत नव्हते. मात्र या शाळांचे बिंग फुटले अन् या विद्यार्थ्यांची गोची झाली. अतिशय कडक वातावरणात परीक्षा झाल्याने ५0 टक्क्यांपर्यंत अनुपस्थितीचे प्रमाण होते. याबाबत चौकशी केल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी २३ एप्रिलला गुन्हे दाखल करण्याचा आदेश सेनगाव गटशिक्षणाधिकाºयास दिला होता. मात्र अजूनही त्यांनी कारवाई केली नाही. २ मे रोजी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही तसा आदेश दिला असून आता गटशिक्षणाधिकारी एस.एस. जगताप यांना कारवाईची तंबी दिली आहे.
अधिकारी मोकळेच
औरंगाबाद विभागीय मंडळाने दिलेल्या आदेशानुसार शाळा मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव व पदाधिकाºयांवर गुन्हे दाखलही होतील. मात्र गाफिल शिक्षण विभाग व विभागीय मंडळातील अधिकारी तर मोकळेच राहणार आहेत. त्यापैकी कोणालाही हे प्रकरण शेकणार नसेल तर हे रॅकेट उद्ध्वस्त होणे शक्य नाही. यातील रॅकेटचा सोक्षमोक्ष लागणेही तेवढेच गरजेचे आहे.