निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:17 AM2018-11-16T00:17:27+5:302018-11-16T00:17:55+5:30
दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
२१ आॅक्टोबर रोजी गोपाल घनश्याम जोशी यांना निलंबित पोलीस गजानन निर्मले, सुमित कहार व दोन अनोळखी इसमांनी सिटी क्लबनजीक जैस्वाल यांच्या घरी अपहरण करून नेले. तेथे गेल्यावर तू तुझ्या पत्नीस दसरा महोत्सवात झोक्यात बसवून का फिरलास या कारणावरून वाद घातला. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या बॅटने हातावर मारून हात फ्रॅक्चर केला. एका अनोळखीने डाव्या पायावर मारुन पाय फ्रॅक्चर केला तर दुसºयाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. यातील फिर्यादी हा उपचारासाठी रुग्णालयात असल्याने तब्बल २५ दिवसांनी यात तक्रार दाखल झाली आहे. यातील एकाही आरोपीस अटक नसून तपास सुरू आहे.
जुगारप्रकरणी गुन्हा
हिंगोली - पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जुगारावर छापा मारून रिसाला बाजार भागातील राहुल बाबाराव शेळके यास पकडले. त्याच्याकडून रोख एक हजार व जुगार साहित्य जप्त केले. याबाबत हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.