...अखेर कर्नाटक राज्यातून पुरातन मूर्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:02 AM2018-02-28T01:02:34+5:302018-02-28T01:02:50+5:30
शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते. मोठ्या शिताफीने आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली होती. तसेच आरोपींनी कर्नाटक राज्यातील तुगाव कुटी येथील घराच्या पाठीमागे जमिनीखाली मूर्ती पुरून ठेवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ ते ३ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पुरातन पंचधातूंची मूर्ती चोरीस गेल्याची तक्रार सुरेश पारसमल जैन यांनी हिंगोली शहर ठाण्यात दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने कामारेड्डी तेलंगणा येथून २१ फेबु्रवारी रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. यात पोलिसांनी आरोपींकडील मूर्ती जप्त केली.
पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक मैराळ यांनी तपास पथक तयार केले. पथकात पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, पोना शेख शकील, सुनील अंभोरे, पोना सुधीर ढेंबरे, पोना जीवन मस्के, शेख मुजीब यांनी तपासाची चक्रे फिरवून सदर गुन्ह्यातील आरोपी शेख हैदर शेख इस्माईल (३०, रा. तुगाव (कुटी), शेख अजिज शेख इमाम हुसेन (२४, रा. ब्याबली तालुका भालकी जि. बिदर राज्य कर्नाटक) आरोपींना कामारेड्डी राज्य तेलंगणा येथून अटक केली. कसून चौकशी केली असता मूर्तीही आरोपी शेख हैदर यांच्याकडून जप्त करण्यात आली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मूर्ती व मूर्तीवरील दागिने चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.