अखेर होर्डिंग्ज हटली, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:08 IST2019-03-14T00:08:11+5:302019-03-14T00:08:19+5:30
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय मंडळीची छायाचित्रे असलेल्या बहुतांश होर्डिंग्ज आज हटविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र बसेसवर अजूनही पुढाऱ्यांच्या छायाचित्रासह जाहिराती झळकत असल्याचे दिसून येत आहे.

अखेर होर्डिंग्ज हटली, पण...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय मंडळीची छायाचित्रे असलेल्या बहुतांश होर्डिंग्ज आज हटविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र बसेसवर अजूनही पुढाऱ्यांच्या छायाचित्रासह जाहिराती झळकत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध यंत्रणांनी तत्परता दाखवून त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या ठिकाणांवर असलेले आचारसंहिता भंग करणारे पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविणे गरजेचे असते. त्यासाठी २४ ते ७२ तासांची मुदतही असल्याचे सांगितले जाते. मात्र अजूनही काही विभागांना जाग येत नसल्याचे चित्र असल्याने लोकमतमधून याबाबतचे सचित्र वृत्त देण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोलपंप, विविध शासकीय कार्यालयांनी होर्डिंग्ज हटविली आहेत. मात्र बसेसवर अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राच्या जाहिराती झळकत असल्याचे दिसत आहे. या विभागाला आचारसंहिता लागू नाही की काय, असा प्रश्न आहे. या बस जिल्ह्यातील आहेत की परजिल्ह्यातील, हाही प्रश्नच आहे.