...अखेर सायकल वाटपाचा निधी केला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:18 AM2018-12-19T00:18:52+5:302018-12-19T00:19:12+5:30

अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना मोफत सायकल वाटपचा निधी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे गरजू मुलींच्या हाती लवकरच सायकल येईल.

 Finally, the cycle fund allocated funds | ...अखेर सायकल वाटपाचा निधी केला वर्ग

...अखेर सायकल वाटपाचा निधी केला वर्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना मोफत सायकल वाटपचा निधी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे गरजू मुलींच्या हाती लवकरच सायकल येईल.
मानव विकास कार्यक्रम योजने अंतर्गत शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. परंतु हा निधी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोफत सायकल वाटपाची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत होत्या. उशिराने का होईना माध्यमिक शिक्षण विभागाला जाग आली. अन्् सायकल वाटपाचा निधी मुख्याध्यापक वर्ग करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण विभागाची दिरंगाई व नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नसल्याची ही समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे. या कारणामुळे ग्रामीण भागातील मुलींची पायपीट होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजारांचा निधी वर्ग करण्यात आला. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर हा निधी आठ दिवसांपुर्वीच वर्ग केल्याची माहिती देण्यात आली आहे.
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव परिसरातील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप न झाल्याने मुलींना शाळेत जाण्यासाठी रोज ३ ते ५ कि.मी. पायी ये-जा करावी लागत आहे. परिणामी, विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायकल वाटप केल्या जात नसल्यामुळे पालकांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही येथील परिसरातील मुलींना सायकल मिळाल्या नाहीत. परंतु आता शिक्षण विभागाकडून सायकल वाटपासाठी लागणार निधी वर्ग करूनही लवकर विद्यार्थिनींना सायकल मिळतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title:  Finally, the cycle fund allocated funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.