शेवटी गुरांच्या सांभाळासाठी धावला बळीराजाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:00 AM2018-04-07T00:00:58+5:302018-04-07T00:00:58+5:30
अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अकोल्यावरुन हैदराबादकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. मात्र गुरांच्या सांभाळासाठी गोशाळेसह अनेक विभागांची दारे ठोठावूनही कुणीच दाद न दिल्याने पोलिसांनाच गुरांचे चारापाणी करावे लागले. मात्र पोलीस व गुरांचे शेतकºयाला हाल पहावेनासे झाल्याने त्यांनी संपूर्ण गुरे सांभाळण्याचीच जबाबदारी स्वीकारली.
२३ मार्च रोजी अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे कत्तलीसाठी घेऊन जाणाºया ४० गुरांची हिंगोली शहर पोलिसांनी सुटका केली होती. या प्रकरणी २४ मार्च रोजी गुरांची वाहतूक करणाºयाविरुद्ध गुन्हाही दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने गुरांच्या संभाळासाठी शहर पोलिसांनी अनेक विभागांना लेखी पत्र दिले. मात्र प्रत्येक विभागाकडून वेगवेगळी उत्तरे देत गोशाळेनेही नकार दर्शविला. त्यामुळे गुरांचे चारा पाणी पोलीस कर्मचाºयांनाच करावे लागत होते. गुरांना चारा देण्यासाठी अनेक सामाजिक संस्थासह नागरिकांनी मदत केली. मात्र त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र होते. एका- एका गुरांची अनेक जण तोंडी मागणी करीत होते. मात्र सर्व गुरे एकाच शेतकºयांनी घेऊन जावीत, असे पोलीस कर्मचाºयांकडून सांगितले जात होते. त्यामुळे सर्व गुरांची जबाबदारी स्वीकारणाºयांच्या पोलीस प्रतीक्षेत होते. शेवटी हिंगोलीतीलच शेतकरी शेख चांद शेख अकबर यांने सर्व गुरे संभाळण्याची जबाबदारी स्वीकारत ठाण्यात रीतसर अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या अर्जाचा विचार करुन सदरील शेतकºयांकडून हमी घेण्यात आली व सर्व गुरे पोलीस कर्मचाºयांनी शेतकºयाच्या शेतापर्यंत गुरे नेऊन घातली. पोलीस ठाण्याच्या आवारात १४ दिवसांपासून घुटमळत असलेल्या बैलांनी आज मोकळा श्वास घेतला. रस्त्यावरुन घेऊन जाणाºया बैलांकडे सर्वाच्याच नजरा एकवटल्या होत्या. जो- तो गुरांचा सांभाळ करणाºयाचे नाव विचारत होता.
कोथळर परिसरात शेख चाँद शेख अकबर यांची जवळपास ३० एकर शेती आहे. त्यामुळे त्यांना गुरांची व पोलिसांची दया आली. त्यानुसार त्यांनी मागणी केली. मात्र जेव्हा मूळ मालक गुरे सोडविण्यासाठी येईल तेव्हा त्यांना गुरे वाहनातून ताब्यात घेतली तेव्हापासून प्रतिबैल १५० रुपयांप्रमाणे मजुरी द्यावी लागणार असल्याने पोउपनि तान्हाजी चेरले यांनी सांगितले. पोलीस गुरांचे चारापाणी करीत असल्याचे पाहावत नसल्यानेच आपण हा धाडसी निर्णय घेतल्याचे शेतकरी शेख चाँद यांनी सांगितले. गुरांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे.