..अखेर शिष्यवृत्ती रक्कम बँकेत वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:40 PM2018-03-16T23:40:16+5:302018-03-16T23:40:35+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे विविध योजनेत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेले १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याणतर्फे बँकेत वर्ग करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे विविध योजनेत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेले १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याणतर्फे बँकेत वर्ग करण्यात आले आहेत.
जि. प. समाज कल्याणअंतर्गत दिली जाणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रीकपूर्व तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु संबधित शाळांनी विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयास सादर केले नव्हते. शिवाय मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून जिल्हा कार्यालयाच्या लॉग इनवर प्रस्ताव प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित होते. याबाबत समाज कल्याणकडून संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सूचनाही दिल्या होत्या. मात्र सदर प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास दिरंगाई केली. त्यामुळे उशिराने का होईना अखेर चार ते पाच दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. तर यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील विद्यार्थ्यांच्याही खात्यावर रक्कम मार्च एण्डपर्यंत वर्ग केली जाणार आहे.
यावर्षी महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने समाज कल्याणकडून स्वीकारण्यात आली. मार्गदर्शनासाठी कॅम्पही भरविले होते.
हिंगोली:१२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
जि. प. समाज कल्याणअंतर्गत पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्य यामध्ये पहिली ते दहावीतील विद्यार्थी व मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार आहे.
२०१६-१७ वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना वारंवार सूचना दिल्या होत्या. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्यात आली.
२०१७-१८ मधील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरही ३१ मार्चपर्यंत वरील योजनेतील शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागातर्फे देण्यात आली.