अखेर हिंगोलीतील पथदिवे झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:15 AM2018-03-02T00:15:55+5:302018-03-02T00:15:59+5:30

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून हिंगोलीतील बंद असलेले पथदिवे आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सुरू झाले आहेत. पालिकेने २५ लाखांचा धनादेश महावितरणला दिला असून ७५ लाख पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहेत.

 Finally, the street lights of Hingoli started | अखेर हिंगोलीतील पथदिवे झाले सुरू

अखेर हिंगोलीतील पथदिवे झाले सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दहा ते पंधरा दिवसांपासून हिंगोलीतील बंद असलेले पथदिवे आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सुरू झाले आहेत. पालिकेने २५ लाखांचा धनादेश महावितरणला दिला असून ७५ लाख पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहेत.
केंद्र व राज्यात सत्ता असताना हिंगोली अंधारात असल्याने चोहोबाजूंनी टीका होत होती. तर पैसे भरायला तयार असताना व जुन्या थकबाकीबाबत हप्ते पाडलेले असताना महावितरणकडून कारवाई होत असल्याने नगराध्यक्ष बाबाराव बांगर व पालिका प्रशासनाने ताठर भूमिका घेतली होती. बांगर यांच्यासह दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील यांनी अधिकाºयांशी चर्चा करूनही फलनिष्पत्ती नव्हती. आज अखेर नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी ही बाब पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या कानावर घातली अन् शहरातील पथदिवे सुरू करण्यास त्यांनी उर्जामंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर २५ लाख भरून पथदिवे रात्री ८ च्या सुमारास सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली होती.
दरम्यान, आज न.प.त गटनेते नेहालभैय्या, सेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, मनसेचे बंडू कुटे, माबूद बागवान आदींनी पथदिव्यांच्या देयकांवर आक्षेप घेत मीटर लावून बिल देण्यासाठी आंदोलनाची तयारी चालविली होती. त्यापूर्वीच पथदिवे सुरू झाले आहेत.

Web Title:  Finally, the street lights of Hingoli started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.