अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

By विजय पाटील | Published: April 20, 2023 06:38 PM2023-04-20T18:38:07+5:302023-04-20T18:38:29+5:30

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे.

Finally, the unopposed plan failed in the Hingoli Bazar Committee; Failure in the front too | अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

googlenewsNext

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोधचा डाव फसला आहे. आघाडी व युतीच्या नेत्यांनी एकमेकांचे विरोधक असतानाही हातमिळवणी केली असली तरीही राष्ट्रवादीने बंडाचे निशान हाती घेतले आहे. त्यामुळे निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे. आता ४७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट यांचा एक पॅनल उभा राहिला आहे. कालपर्यंत एकमेकांचे हाडवैरी असलेले बिनविरोधसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत रणनीती आखताना दिसत होते. तर राष्ट्रवादीला मात्र यात स्थानच दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी करून कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावले होते. तर इतर पक्षातील काही असंतुष्टही गळाला लागणार हे माहिती होते. त्यामुळे या सर्वांना एकत्र करून शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरविला आहे. काहींनी दोन्ही पॅनलपेक्षा वेगळी चूल मांडत अपक्षाच्या झेंडा हाती घेतला आहे.

 गजानन घ्यार बिनविरोध
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून गजानन आनंदा घ्यार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भैय्या पाटील गोरेगावकर, उद्धवराव गायकवाड, परमेश्वर मांडगे यांच्या हस्ते गजानन घ्यार यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Finally, the unopposed plan failed in the Hingoli Bazar Committee; Failure in the front too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.