अखेर हिंगोलीत पथदिवे झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:36 AM2018-04-25T00:36:59+5:302018-04-25T00:36:59+5:30
मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक अभियंता जाधव यांच्यासोबत बैठक झाली. त्यात पथदिव्यांच्या देयकातील थकबाकीपैकी ३५ लाख रुपये भरण्याचे ठरले. तर शहरातील पथदिव्यांचे जोेडभार व मीटर, त्यावरील प्रत्यक्ष विद्युत वापर याचा वस्तुस्थितीदर्शक संयुक्त सर्व्हे करून सुधारित बिले न.प.स द्यावीत, असे ठरले. तर शहरातील मीटर चालू आहेत की बंद, याची माहितीही घेण्यास सांगण्यात आले आहे. किती नवीन जोडण्यांची गरज आहे, याचा सर्व्हे करावा त्यानुसारच देयक द्यावे, असे ठरले. तेव्हाच देयक अदा केले जाईल, असे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी कळविले. यावेळी कार्यकारी अभियंता लोंढे, उपअभियंता दिनकर पिसे, नगरसेवक गणेश बांगर, थोरात, सुलाखे आदींची उपस्थिती होती. मागील अनेक दिवसांपासून अंधारात असलेले शहर पुन्हा झगमगणार आहे.