अखेर ‘ते’ वानर वन विभागाच्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:52 AM2018-06-19T00:52:50+5:302018-06-19T00:52:50+5:30

वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे.

 Finally 'they' in the cage of the forest forest department | अखेर ‘ते’ वानर वन विभागाच्या पिंजऱ्यात

अखेर ‘ते’ वानर वन विभागाच्या पिंजऱ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कौठा : वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे.
सदरील वानर पकडल्याने गावकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कौठा येथे चार दिवसांपासून या वानराने हैराण केले होते. सुरुवातीला फक्त लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्यानंतर अतिशय आक्रमक होऊन महिला, पुरुषांवर धावून जाणे, चावणे, ओरबाडणे व ढकलून देणे अशा प्रकारे हल्ले करू लागले. यात तीन दिवसांत १५ ग्रामस्थ जखमी झाले होते. वानराच्या भीतीने मंदिरात जाण्यासही ग्रामस्थ घाबरत होते, तर महिला व मुले घराबाहेर पडण्यास भीत होते. याबाबत गांवकºयांनी वसमत येथील वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे १७ जून रोजी वनविभागाच्या कर्मचाºयांनी गावात येवून या वानराला गावाच्या बाहेर हुसकावून लावले. परंतु त्याने पुन्हा गावात येऊन धुमाकूळ घालत वैजनाथ खराटे यांना गंभीर जखमी केले. याबाबत लोकमत ने १८ जून रोजी वृत्त प्रकाशित करून वनविभागाकडून ठोस कार्यवाहीची मागणी केली होती. १८ जून रोजी पुन्हा दिवसभर सदरील वानर गावातच होते. सायंकाळी ४.३० वा. वनविभागाचे वनपाल पवार, वनरक्षक आयनले व कर्मचारी व औरंगाबाद जिल्ह्यातील वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी व त्यांचे पथक पिंजºयासह दाखल झाले. वानर बसलेल्या घराजवळ त्यांनी पिंजरा लावून त्यात खाद्यपदार्थ टाकले. थोड्याच वेळात वानर पिंजºयात शिरताच लोखंडी पिंजºयाचे दार बंद करण्यात आले. वानर पिंजºयात अडकताच जमलेल्या गावकºयांनी सुटकेचा श्वास घेतला.
वानराच्या हल्ल्यात जखमी होऊन हात फ्रॅक्चर झालेले किशनराव देशमुख म्हणाले की, वानराच्या हल्ल्याने आम्ही अतिशय घाबरलो होतो. मंदिरात नित्यनेमाप्रमाणे पूजेला जायचीही भीती वाटत होती. पण आता वानर पकडल्या गेल्यामुळे भीती नाहीशी झाली आहे. तसेच वानराला पकडणारे प्राणीमित्र समाधान गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरील वानराच्या डोक्याला जखम झालेली आहे. यामुळे ते पिसाळून क्रूर बनले. आता या वानरास उपचार करून माहूर किंवा किनवट येथील जंगलात सोडण्यात येणार आहे.

Web Title:  Finally 'they' in the cage of the forest forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.