अखेर त्रासदायक माकड पिंजऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:20+5:302021-07-26T04:27:20+5:30
हिंगोली : शहरातील बिरसा मुंडा चौकाजवळ असलेल्या जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात महिनाभरापासून वास्तव्यास असलेल्या त्रासदायक माकडाला पकडण्यात वन ...
हिंगोली : शहरातील बिरसा मुंडा चौकाजवळ असलेल्या जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात महिनाभरापासून वास्तव्यास असलेल्या त्रासदायक माकडाला पकडण्यात वन विभागाला महिनाभरानंतर यश आले. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शहरातील बिरसा मुंडा चौकाजवळ जिल्हा परिषद विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. परिसरात मागील एक महिन्यापासून एका लाल तोंडाच्या माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या माकडाने परिसरातील वडाच्या झाडाचा राहण्यासाठी सहारा घेतला होता. दिवसा दिसेल त्या घरात जाऊन महिला व लहान मुलांना त्रास देत होते. काही नागरिकांनी हाकलण्याचा प्रयत्न केला; परंतु हे माकड जात नव्हते. मात्र, हे माकड काही जात नव्हते. यानंतर नागरिकांनी वन विभागाला याची कल्पना दिली. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर २५ जुलै रोजी या त्रासदायक माकडाला वन विभागाने पिंजऱ्यात कैद केले. याकामी वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी. टाक यांच्या मार्गदर्शनखाली वन परिमंडळ अधिकारी जी.पी. मिसाळ, वनरक्षक अनिल राठोड, पी.टी. केंदळे यांच्यासह प्राणीमित्र विश्वंभर पटवेकर महाराज, वनसेवक संग्राम भालेराव, सिद्धार्थ रणवीर, वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे,गजानन चव्हाण यांचे सहकार्य
तीन दिवसांपूर्वीच पिंजरा लावला...
जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी नागरिकांना त्रास देणाऱ्या माकडाला पकडण्यासाठी काही दिवसांपूर्वी वन विभागाकडे तक्रार दिली होती.
वन विभागाने तक्रारीची दखल घेऊन २३ जुलै रोजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी पिंजरा लावला. २५ जुलै रोजी पहाटे ५ वाजता सदरील माकड पिंजऱ्यात अडकले गेले. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला पकडले व वन विभागात नेऊन सोडले. फाेटाे नं. ०५