हमीभाव केंद्रांचा पत्ता मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:52 PM2018-10-18T23:52:26+5:302018-10-18T23:52:40+5:30
बाजार समिती, खरेदी विक्री संघाला नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यात अपशय आल्यानंतर आता शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फंडा समोर आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. नोंदणी कुठे करायची अन् कोण माल खरेदी करणार याचा अद्यापही ताळमेळ नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बाजार समिती, खरेदी विक्री संघाला नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यात अपशय आल्यानंतर आता शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फंडा समोर आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. नोंदणी कुठे करायची अन् कोण माल खरेदी करणार याचा अद्यापही ताळमेळ नाही.
मागील तीन वर्षांपासून शेतकरी मातीमोल भावाने आपला माल विकत आहे. नाफेडचे खरेदी केंद्र तर शेतकºयांची लूटमार करण्याचे शासन देखरेखीखालील केंद्र बनले होते. ज्यांच्या हाती हमीभावाचे कोलीत आले, त्यांनी आगच लावण्याचे काम केल्याचे एकंदर चित्र जिल्हाभरातील केंद्रांवर पहायला मिळाले. नोंदणीपासून ते माल वेळेत खरेदी करण्यापर्यंत सर्वच बाबींसाठी दाम मोजायला लागला होता. यंदा त्यातून सुटकारा मिळेल, असे वाटत होते. पहिल्यांदाच सोयाबीनची आर्द्रता तपाण्यासाठी मशिनही दाखल झाल्या होत्या. मात्र हा सर्व शेतकºयांची दिशाभूल करण्यासाठी फार्स होता, असेच दिसून येत आहे. मोंढ्यात मातीमोल भावाने शेतकरी आपला माल विकत आहे. हमीभाव केंद्राचा मात्र पत्ता नाही. हमीभावाने मालाची खरेदी करण्यासाठी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आदेशित केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी अधिकृतपणे कोणी घोषणा केली नाही. शेतकºयांनाही त्याची माहिती नाही. त्यामुळे कुणी खरेदी-विक्री संघ तर कुणी बाजार समितीत विचारणा करीत आहे. यात काहीजण तर आपोआपच दलालांच्या गळाला लागत आहेत. परंतु नेमकी खरेदी कोण करणार? नोंदणी कुठे करायची? माल कुठे आणायचा? याची उत्तरे शेतकºयांना मिळेपर्यंत तर मोंढ्यातच पूर्ण माल विकावा लागू शकतो, असे चित्र आहे.