५५४ वाहनधारकांकडून दीड लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:54+5:302021-09-21T04:32:54+5:30
जिल्ह्यातील हजारो वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित आहे. ज्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे. ...
जिल्ह्यातील हजारो वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित आहे. ज्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे. मात्र, तो दंड अर्थात चलन अद्याप अदा केले नाही, अशा वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतली आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ज्या वाहनधारकांनी दंड अथवा चलनाचा भरणा केला नाही, अशी प्रकरणे अंतिम निवाड्याकरिता लोकअदालतीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारक थकीत असलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी येथील वाहतूक शाखेकडे येत आहेत. २० सप्टेंबरला ५५४ वाहनधारकांनी १ लाख ५८ हजारांच्या रकमेचा भरणा केला आहे. यात २०० रुपयांपासून ते १० हजार ६०० रुपयांच्या दंडाच्या रकमेचा समावेश आहे. वाहनधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसवरील लिंकवरून अथवा कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन थकीत रकमेचा भरणा करता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.