वसमत नगरपरिषदेच्या संगणक रूमला आग; १२ लाखांचे साहित्य जळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:30 PM2023-11-09T18:30:46+5:302023-11-09T18:31:33+5:30
नगर परिषदेच्या कामकाजासाठी नव्याने उभारलेल्या संगणक रूमधून धूर निघत असल्याचे आज पहाटे ३ वाजता आढळून आले.
वसमत: येथील नगरपरिषदेत नव्याने उभारण्यात येणाऱ्या संगणकरूमला बुधवारी पहाटे तीन वाजेदरम्यान शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत डझनावर संगणक व साहित्य जळून खाक झाले. या आगीत १२ लाखांवर नुकसान झाले असून सदरील आग शॉर्टसर्किटमुळे लागली, असे सांगितले जात आहे.
नगर परिषदेच्या कामकाजासाठी नव्याने उभारलेल्या संगणक रूमधून धूर निघत असल्याचे आज पहाटे ३ वाजता आढळून आले. याची माहिती नगरपरिषद अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. अग्निशमन विभागाचे कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काहीवेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.मात्र, तोपर्यंत संगणक रूमधील १२ नवे संगणक व महत्त्वाचे साहित्य, फाईल जळाल्याचे सांगितले जात आहे. एकूण १२ लाखांवर नुकसान झाल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.
संगणक बसविण्याचे काम सुरु होते...
नगरपालिकेत कामकाजासाठी नव्याने संगणक रूम उभारण्यात आली आहे. या रुममध्ये संगणक बसवण्याचे काम सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात नवे १२ संगणक व साहित्य जळून खाक झाले.
- अशुतोष चिंचाळकर, मुख्याधिकारी, मुख्याधिकारी, वसमत