पूर्णा साखर कारखान्यात आग लागून २५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:02 AM2019-04-11T00:02:45+5:302019-04-11T00:03:03+5:30
येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने कारखान्यातील बगॅस व इतर साहित्य खाक झाले. मंगळवारी रात्री सव्वा नऊ आणि बुधवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आग लागल्याने मोठे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने कारखान्यातील बगॅस व इतर साहित्य खाक झाले. मंगळवारी रात्री सव्वा नऊ आणि बुधवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आग लागल्याने मोठे नुकसान झाले.
कारखान्यात बुधवारी रात्री अचानक आग लागली असता कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियंत्रणात आणली. परंतु बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान पुन्हा अचानक आग लागल्याने बगॅस कॅरिअर साहित्य, बेल्ट रोटर आणि वायरिंग जळाल्याने जवळपास २५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिलीे. ही आग कर्मचारी आणि वसमत नपच्या अग्निशामक दलाच्या मदतीने विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत जीविताची हानी झाली नाही. कारखान्यातील यंत्रसामुग्री जळून खाक झाल्याने नुकसान झाले.