आग आटोक्यात आणण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:54+5:302021-04-27T04:30:54+5:30
२४ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लिंबाळा येथील डम्पिंग ग्राउंडला अचानक आग लागली. या आगीत कचऱ्याव्यतिरिक्त काहीही जळाले ...
२४ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लिंबाळा येथील डम्पिंग ग्राउंडला अचानक आग लागली. या आगीत कचऱ्याव्यतिरिक्त काहीही जळाले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी पहिल्या दिवशी कळमनुरी, औंढा या तालुक्यांच्या अग्निशमन गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. २५ एप्रिल रोजी दोन्ही तालुक्यांच्या गाड्या पाठवून देण्यात आल्या. परंतु, २६ एप्रिलपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. २६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अग्निशमन विभागप्रमुख बाळू बांगर यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्याच्या सूचना दिल्या. डम्पिंग ग्राउंडवरील काही ढिगाऱ्यांतून धूर निघत असल्यामुळे त्यावर पाण्याचे फवारेही मारण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी आग आटोक्यात आणण्यासाठी आकाश सांगळे, रघुनाथ बांगर, बंडू हाटकर, बजरंग थिटे, दिलीप दोडके, दीपक गायकवाड या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.