हट्टा परिसरात आखाड्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:27 AM2019-05-07T00:27:27+5:302019-05-07T00:27:45+5:30
येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते.
परिसरातील आखाडे, कडब्याच्या गंजी, झोपडे, तुºहाट्या, पºहाट्या, जळतन आदीला आग लागली. दुपारची वेळ व वर्दळ नसल्याने आग लागल्याचे लक्षात आले नाही. सदरील आग लागताच शेख सादीक, नंदराज दीक्षित यांनी अग्निशमन पथक व हट्टा पोलिसांना माहिती कळविली. परिसरातील आखाड्यात नंदराज दीक्षित यांचे शेड, शेषराव गलांडे, बेगाजी शिंदे, दत्तराव पारटकर, गंगाधर पारटकर, मारोतराव चट्टे, गंगाधर चट्टे आदींच्या झोपड्या, कडबा, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. जनावरासाठी ठेवलेला जवळपास ५ हजार कडबा जळाला. आगीचे रौद्ररूप पाहता परिसरातील नागरिक शेख बशीर, शेख इरशाद, गोविंद कंगळे, राजू अंबेकर, शेख इरशाद, नारायण पारटकर, हरिदास चट्टे, के.एम.चट्टे, शेख इलियास, अभिजीत देशमुख, पठाण, बाबा भांडे, हरिदास चट्टे, शेख चाँद, शेख वाजेद आदींनी परिश्रम घेतले.
अग्निशमन दल आल्यानंतर आग पूर्णत: आटोक्यात आली. तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविली. घटनास्थळी बीट जमादार इमरान सिद्दीकी, संदीप बोचरे, ग्रा.पं.चे रविराज देशमुख, शेख खालेद, के.एम. चट्टे आदींनी भेट दिली. आगीच्या घटनेमुळे कडब्याच्या गंजीतून साप निघाला. त्यामुळे धावपळ वाढली. घटनास्थळ गावाच्या बाहेर असल्याने मोठे संकट टळले. यावेळी बघ्याची गर्दी जमली होती. जनावरांचे वैरण, शेतीपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामा करून त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.