पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच कापडसिंगी येथे शस्त्रक्रिया विभाग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:52+5:302021-01-08T05:36:52+5:30

पहिल्या शिबिरात १४ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पंधरा वर्षांपासून कुटुंब नियोजन ...

For the first time in fifteen years, a surgical department has been started at Kapadsingi | पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच कापडसिंगी येथे शस्त्रक्रिया विभाग सुरू

पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच कापडसिंगी येथे शस्त्रक्रिया विभाग सुरू

Next

पहिल्या शिबिरात १४ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पंधरा वर्षांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जात नव्हते. या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली होती; परंतु या सर्व अडचणीवर मात करीत आरोग्य विभागाने तब्बल पंधरा वर्षांनंतर या आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया विभाग चालू केला. ५ जानेवारी रोजी पार पडलेल्या शिबिराचे उद्‌घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्जन डॉ. रामहरी बेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ काकडे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात एकूण १४ शस्त्रक्रिया सर्जन डॉ. रामहरी बेले यांनी केल्या. तालुका सुपरवायझर अशोक जोशी यांनी प्रा. आ. केंद्राच्या शस्त्रक्रियागृहातील स्वॅब नांदेड येथे तपासणीसाठी सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ऑपरेशनची सुविधा कापडसिंगी येथेच सुरू झाल्यामुळे या कार्यक्षेत्रातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

या शिबिरासाठी सुपरवायझर अशोक जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ काकडे, औषध निर्माण अधिकारी नितीन वाढवे, आरोग्य सहायक सखाराम साबळे, दिलीप काकडे, आरोग्य कर्मचारी मारोतराव पोले, प्रताप साबळे, गणेश पुरी, प्रकाश वाडेकर, अशोक गरपाळ, श्रीमती कांबळे, श्रीमती गुडधे, श्रीमती जामनिक, श्रीमती ठोके, श्रीमती इंगोले, श्रीमती पवार, श्रीमती देवकर, रेखा हाके, जाधव, हाके, माळोदे निशांत, चव्हाण, सतीश हाके, श्रीमती खंदारे, श्रीमती कोकिळाबाई व कौशल्याबाई आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रा. आ. केंद्राला एकूण उद्दिष्ट २०२ एवढे आहे, तरी पुढील तीन महिन्यांमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. यापुढे दर मंगळवारी कुटुंब कल्याण शिबिर आयोजित करण्यात येणार असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी केले आहे.

Web Title: For the first time in fifteen years, a surgical department has been started at Kapadsingi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.