हिंगोली जिल्ह्यातून पाच जणांना दोन वर्षासाठी केले हद्दपार

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 30, 2023 06:57 PM2023-01-30T18:57:56+5:302023-01-30T18:58:17+5:30

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची कारवाई

Five people were deported from Hingoli district for two years | हिंगोली जिल्ह्यातून पाच जणांना दोन वर्षासाठी केले हद्दपार

हिंगोली जिल्ह्यातून पाच जणांना दोन वर्षासाठी केले हद्दपार

Next

- चंद्रमुनी बलखंडे, हिंगोली
हिंगोली :
संघटितपणे गुन्हे करणाऱ्या पाच जणांवर  प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचे आदेश काढले आहेत.

शेख अफरोज शेख गैबू, शेख मोसीन शेख गैबू, शेख शब्बीर शेख चाँद, शेख अजीस शेख चाँद, शेख वसीम शेख अजीस (सर्व रा. हमालवाडी, हिंगोली ) असे दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. त्यानंतरही ते सतत संघटितपणे गुन्हे करीत होते. प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नव्हता. 

त्यामुळे पोलिस उप निरीक्षक एम.ई. जिव्हारे यांनी त्यांचेविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत  पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता.  या प्रस्तावाची तपासणी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाचही जणांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश काढले आहेत.

Web Title: Five people were deported from Hingoli district for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.