जिल्ह्यात पाच तालुके ; परंतु, तीन तालुक्यांतच ३० टक्के उद्योग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:56+5:302021-06-11T04:20:56+5:30
हिंगोली येथील एमआयडीसीसाठी २०४.९० हेक्टर जमीन अधिगृहीत केली आहे. येथे एकूण २७७ भूखंड असून २७२ वाटप केले आहेत. वसमत ...
हिंगोली येथील एमआयडीसीसाठी २०४.९० हेक्टर जमीन अधिगृहीत केली आहे. येथे एकूण २७७ भूखंड असून २७२ वाटप केले आहेत. वसमत येथील एमआयडीसीसाठी १५.०० हेक्टर जमीन अधिगृहीत केली आहे. येथे एकूण ४० भूखंड असून ३८ भूखंड वाटप केले आहे. तर कळमनुरी येथील एमआयडीसीसाठी ९.०० हेक्टर जमीन अधिगृहीत केली आहे. येथे एकूण ३३ भूखंड असून ३० भूखंडाचे वाटप केले आहे.
सद्य: स्थितीत हिंगोली येथील एमआयडीसीमध्ये ३५ उद्योग सुरु आहेत. वसमत येथील एमआयडीसीमध्ये १० उद्योग सुरु आहेत तर कळमनुरी येथील एमआयडीसीमध्ये ४ उद्योग सुरु असल्याची माहिती एमआयडीसी व्यवस्थापकांनी दिली.
प्रतिक्रिया
सध्या बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हाताला कामही राहिले नाही. ‘सीएमईएलपी’ योजनेद्वारे कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला आहे, परंतु, अजून तरी कर्ज मिळाले नाही. उद्योजक होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होते की नाही, हाही मोठा प्रश्न आहे. पाठविलेले अर्ज मंजूर होत नाहीत. यासाठी बँकांना अनेकवेळा विनंतीही केली आहे.
- दत्ता उचितकर, लाभार्थी
‘पीएमईएलपी’ या योजनेद्वारे उद्योग करण्यासाठी फाईल टाकली. त्यासाठी रितसर अर्जही केला.परंतु, दोन-चार महिने झाले तरी अजूनही कर्जाची फाईल मंजूर झालेली नाही. माझे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण होते की नाही ,हे कळायला मार्ग नाही. बेकारीमुळे जीव कंटाळवाणा झाला आहे. आज तरी हाताला काम राहिलेले नाही.बँकांनी अर्ज मंजूर करावेत.
- विकास उंडाळ, लाभार्थी
हाताला कामा मिळावे म्हणून मी ‘सीएमईएलपी’ या योजनेअंतर्गत अर्ज केला. आहे. अजून तरी पाठविलेला अर्ज मंजूर झाला नाही. उद्योजक होण्याचे माझे स्वप्न कधी पूर्ण होणार ? हाता काम कधी मिळणार? हे प्रश्न सतावत आहेत. संबंधित बँका कर्जाचे अर्ज मंजूर करीत नाहीत? हे न समजणारे कोडेच म्हणावे लागेल. बँकांनी लाभार्थिंचे अर्ज मंजूर करावेत.
शेख रहीम शेख इमाम, लाभार्थी