शहरातील पाच टॉवर कायमस्वरूपी केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:11+5:302021-09-16T04:37:11+5:30
हिंगोली : शहरातील विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यावरून नगर परिषदेेने पाचही टॉवर कायमस्वरूपी सील करून कारवाई ...
हिंगोली : शहरातील विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यावरून नगर परिषदेेने पाचही टॉवर कायमस्वरूपी सील करून कारवाई केली. १५ सप्टेंबर रोजी शहरातील जिजामातानगर, एनटीसी मिल परिसर, तालाब कट्टा रोड, आदर्श कॉलेज परिसर, आदी भागांत असलेले इंडस टॉवर, एअरटेल टॉवर, एटीसी टॉवर असे पाच टाॅवर कायमस्वरूपी सील करून त्यास टाळे ठोकले आहे. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश हेंबाडे, विद्युत अभियंता वसंत पुतळे, पाणीपुरवठा अभियंता गजानन हिरेमठ, संदीप घुगे, विजेंद्र हेलचेल, रामेश्वरे, रूपेश क्यातमवार यांनी केली.
कर भरेपर्यत बंदच राहणार
शहरातील मोबाईल कंपन्यांनी मागच्या काही महिन्यांपासून कर भरलेला नाही. जोपर्यंत या मोबाईल कंपन्या अधिकृत परवाना घेणार नाहीत आणि कर भरणार नाहीत, तोपर्यंत सदरील पाचही टॉवर कायमस्वरूपी बंद राहतील.