हिंगोलीत असना नदीचे उग्ररुप; कुरुंदा, कौठा गावांना पुराचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:31 AM2020-09-18T10:31:04+5:302020-09-18T10:36:03+5:30
कुरुंदा येथे साडेतीन तासात तब्बल ९२ मिमी पावसाची नोंद
हिंगोली : कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री 2 ते सकाळी 5.30वाजेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जलेशवर (असना)नदीचे पात्र ओलांडून गावात महापूर आला. अनेक घरात पाणी घरात पाणी शिरल्याने पुराचा तडाखा नागरिकांना बसला आहे. नदी ,नाल्याकाठचे शेताची खरडाखरडी झाल्याने कापुस, सोयाबीन या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कुरुंदा येथे जवळपास 3.30 तास सलग पाऊस झाल्याने या भागातील कुरुंदा, डोनवाडा, सुकळी, कोठारी, कुरुंदवाडी गावातील नदी ,नाले दुथडी भरून शेतांनी पाणी वाहत होते.शुक्रवारी रात्री 92 मिमी पाऊस झाल्याची नोंद असून या पावसाळ्यात हा या भागात सर्वात मोठा पाऊस होता.
कुरुंदा नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने गुडघ्याऐवळे पाणी वाहत होते.गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी चक्क अनेक वस्तीतील घरात शिरले.गणेश नगर,आरामशिन भाग,लवहुजी नगर ,श्रीवस्ती नगर,साईबाबा गल्ली,संत तुकाराम महाराज गल्ली, रायगड नगर,दर्गा मोहल्ला या वस्तीतील शेकडो घरात पाणी शिरले होते.त्यामुळे संसारउपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले परंतु जीवितहानी झाली नाही.रात्री पासून घरात पाणी शिरू लागल्याने काहीनी पत्रावर तर काहीनी उंच ठिकाणी, शेजारच्या इमारतीत थांबण्याची वेळ नागरिकावर आली होती. गावातील पाणी थेट नदीत जाण्यासाठी कोणताच नाला नसून ग्रा प गाळेच्या पाठीमागचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीच ठोस उपायोजना नाही त्याकडे ग्रा.प. दुर्लक्ष दिसते.
दरवर्षी महापुरचा फटका बसला परंतु ठोस उपाययोजना आखल्या जात नाही.अनेक वस्तीसह गावातील दुर्गामाता मंदीराला पाण्याने वेढले होते.नदी ,नाल्याचे पाणी शेतात वाहत असल्याने कापूस,सोयाबीन, हळद या उत्पादकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसते.या पुराचा शेतीला मोठा तडाखा बसला आहे.कुरुंदयासह कोठारी,डोणवडा,सुकळी, कुरुंदवाडी, या गावातील शेतीचे नुकसान झाले आहे.2016 मध्ये 29 जून रोजी ढगफुटी झाली होती तेव्हा 144 मिमी सर्वाधिक पाऊस झाला होता.पुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करिता एकही वरीष्ठ अधिकारी कुरुंदयाकडे फिरकला नाही.
कौठा गावालाही तडाखा
कौठ्यात ही असना नदीचा प्रकोप झाला असून प्रचंड महापूर आलेला आहे, नदीकाठचा पूर्ण परिसर जलमय झालेला असून सकाळी ३ ते ५ दरम्यान ढगफुटी सारखा पाऊस झाला असून अजूनही आभाळ भरून आहे,नदीकाठची शेती खरडून गेली असून वसमत कौठा कुरुंदा मार्गावरील तोंडपुसी ओढ्याला ही पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे