सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:53 AM2018-11-07T00:53:16+5:302018-11-07T00:53:52+5:30

सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम, तात्पुरत्या फटाका विक्रेत्यांनी कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे हे फटाके विकले जाणार नाहीत.

 Follow the Supreme Court order | सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळा

सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम, तात्पुरत्या फटाका विक्रेत्यांनी कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे हे फटाके विकले जाणार नाहीत. फटाक्याची खरेदी विक्री आॅनलाईन पद्धतीने जसे फ्लीपकार्ट, अ‍ॅमेझॉन वगैरे कंपनीकडून होणार नाही. आॅनलाईन खरेदी विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
संलग्न फटाक्याच्या (लड, डब्बल बॉम्ब) विक्रीवर व वापरावर बंदी असल्याने सदर फटाक्याचा वापर होणार नसून प्रतिबंधीत केलेले फटाके विक्री होणार नाहीत. फटाक्यांमध्ये बेरीएम सॉल्ट प्रतिबंधीत असल्यामुळे बेरीएम सॉल्टयुक्त फटाके वापरू नयेत. फटाक्याच्या हानीकारक प्रभावाविषयी जनतेस माहिती देऊन विस्तृत जनजागृती मोहीम शाळा महाविद्यालयांमार्फत राबवावी अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाºया व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी न्यायालयाने घातली असून आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले.
दिवाळी व इतर सनाच्या वेळी फटाके रात्री ८ ते १० या वेळेतच फोडवेत. तसेच ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त फटाके फोडण्याची वेळी ही रात्री ११.५५ ते १२.३० पर्यंतच आहे. वरील सर्व आदेश सर्वाेच न्यायालयाच्या असून या आदेशांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title:  Follow the Supreme Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.