अनुदानावर उभारता येणार अन्नप्रक्रिया उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:25 AM2018-01-31T00:25:37+5:302018-01-31T00:25:41+5:30
शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी दूर करून उत्पादन ते बाजारपेठ ही साखळी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी दूर करून उत्पादन ते बाजारपेठ ही साखळी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. या उद्योगांसाठी ठराविक अनुदानही दिले जाणार असून लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
वेगाने होणारे शहरीकरण व मोठ्या प्रमाणावर असलेल्या मध्यमवर्गीय गटाच्या क्रयशक्तीनुसार त्यांची खरेदीची ऐपत लक्षात घेता अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना आणाली आहे. यात कृषी अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण हा एक भाग तर दुसºयात शीतसाखळी, मूल्यवर्धन आणि साठवणुकीच्या (फलोत्पादनव्यतिरिक्त) पायाभूत सुविधा निर्माण करणे हा दुसरा भाग आहे. शेतकºयांच्या दारापासून ते ग्राहकांपर्यंत पूर्ण सुविधा निर्माण करण्यासाठी उत्पादनाच्या ठिकाणी प्रीकूलिंग, रेफरव्हॅन, फिरत्या शीतगृहासाठी अनुदान दिले जाणार आहे. फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने आदीवर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प चलविणारे किंवा स्थापन करणारे शासकीय, सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी/गट, महिला स्वयंसहायता बचत गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था आदींना अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाल्यासारख्या नाशवंत शेतीमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक व्ही.डी.लोखंडे यांनी केले.
कारखाना व यंत्रसामुग्री आणि तांत्रिक नागरी बांधकामाच्या किमतीच्या ३0 टक्के अनुदान व कमाल मयांदा ५0 लाख राहणार आहे. या योजनेत अनुदान बँक ऐडेड क्रेडिट लिंक्ड सबसिडी या तत्त्वानुसार समान दोन हप्त्यात प्रकल्प पूर्ततेनंतर व पूर्ण क्षमतेने उत्पादनात आल्यानंतर देण्यात येणार आहे. प्रकल्पांना अनुदानाच्या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम किमान दीडपट असावी.