औंढ्यात मराठा आंदोलकांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना घेराव
By रमेश वाबळे | Published: September 2, 2023 03:16 PM2023-09-02T15:16:24+5:302023-09-02T15:17:05+5:30
भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त सुधीर मुनगंटीवार औंढा येथे आले आहेत
औंढा नागनाथ : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार २ सप्टेंबर रोजी औंढा येथे भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त आले होते. मुनगंटीवार बैठकस्थळी पोहोचताच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व मराठा समाज बाधवांच्या वतीने जालना येथील घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत त्यांना घेराव घातला.
भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त मुनगंटीवार औंढा येथे दुपारी १२ च्या सुमारास औंढा येथे आले होते. यावेळी बैठकस्थळी पोहोचताच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना घेराव घालून जालना येथील घटेनच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीमार का केला? असा सवालही काहीजणांनी मुनगंटीवार यांना केला. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. त्यावर लाठीमारची घटना निंदनिय असून, त्याचा मीही निषेध नोंदवतो. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी औंढा नागनाथ, जवळा बाजार परिसरातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.