खून प्रकरणातील चार आरोपी जेरबंद; एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:55 AM2018-11-12T00:55:55+5:302018-11-12T00:56:12+5:30
: लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चार आरोपींना सेनगाव पोलिसांनी रविवारी जेरबंद केले असून एक आरोपी फरार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चार आरोपींना सेनगाव पोलिसांनी रविवारी जेरबंद केले असून एक आरोपी फरार आहे.
दाताडा बु. येथील कैलास माणिकराव शिंदे यांची कोमल या मुलीस गावातील सचिन नारायण सुरनर याने लग्नाची मागणी घातली होती. पंरतु सचिन हा व्यसनाधीन असल्यामुळे तसेच त्याचा स्वभावही वाईट असल्याने तसेच एका समाजाचे असून बेटी व्यवहार नसल्याने हे स्थळ शिंदे यांनी नाकारले होते. हाच राग मनात धरून ९ आॅक्टोबर भाऊबीजच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता गावातील मारोती मंदिराजवळ सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर यांनी गुप्तीने व काठीने तर नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे या दोघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत कैलास शिंदे यांच्या पोटात चाकूचे खोलवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच कैलास शिंदे यांचे चुलत भाऊ भूजंग धोंंडबाराव शिंदे यांनाही चाकूचे गंभीर वार करीत मारहाण केली होती. मारहाणीत कैलास शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन सुरनर, किरण सुरनर, नितीन कवडे, विश्वनाथ कवडे या चार आरोपींना ११ नोव्हेंबर रोजी सेनगाव पोलिसांनी अटक केली. तर गणेश कवडे हा आरोपी फरार असल्याचे पोउपनि बाबूराव जाधव यांनी सांगितले.