दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, पिस्तूलसह कार, खंजीर जप्त

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 23, 2023 12:25 PM2023-07-23T12:25:13+5:302023-07-23T12:25:26+5:30

पोलिसांना पाहताच त्यातील एक जण पळून गेला. इतर चार जणांना पथकाने ताब्यात घेतले.

Four arrested for robbery, car with pistol, dagger seized | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, पिस्तूलसह कार, खंजीर जप्त

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, पिस्तूलसह कार, खंजीर जप्त

googlenewsNext

चंद्रमुनी बलखंडे

हिंगोली: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित दरोडेखेरांना स्थनिक गुन्हे शाखेच्या पथ्काने ताब्यात घेतले. ही कारवाई येथील रेल्वे स्थानक परिसरात 22 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, खंजीरसह दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

हिंगोली येथील रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळया जागेत काहीजण एखादा गुन्हा करण्याच्या उददेशाने थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने,पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, प्रेच चव्हाण, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल ख्ंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसर गाठले. यावेळी मालगाडी रॅक जवळ एम.एच. ४७ वाय ४१३० ही कार आढळून आली. तसेच जवळच असलेल्या सरस्वती नगर परिसरात काही जण लपून बसलेले दिसले.

पोलिसांना पाहताच त्यातील एक जण पळून गेला. इतर चार जणांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांना नाव गाव विचारले असता त्यांनी गणेश भुजंगराव मोरे(रा.शाहू नगर, हडको नांदेड),वासुदेव मोरोती चौंढीकर(रा.हडको नांदेड), बुद्धभूषण भगवान खिल्लारे(रा.शाहू नगर हिंगोली),  संदीप अंबादास कुहिरे(रा. जिल्हा परिषद वसाहत हिंगोली) अशी नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता मॅक्सझिनसह गावठी पिस्तुल, ६ एमएमचे ४ राऊंड, दोन खंजीर, एक रॉड, मिरची पावडर, दोरी व एक कार असा एकूण ५ लाख ९१ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी  रविवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या फिर्यादिवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर तपास करीत आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेने दरोडा टाळला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच कारवाई केल्याने दरोड्याची घटना टाळली. विशेष म्हणजे यातील गणेश मोरे यास नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.

Web Title: Four arrested for robbery, car with pistol, dagger seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.