तक्रारी येऊ लागल्याने नेमले चार कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:30 AM2021-07-28T04:30:59+5:302021-07-28T04:30:59+5:30
कोरोना काळ व त्या अगोदरपासून एकाच कर्मचाऱ्यावर सिटीस्कॅन विभागाचा कारभार चालत होता. कोरोना काळात तर सिटीस्कॅन विभाग बंद राहत ...
कोरोना काळ व त्या अगोदरपासून एकाच कर्मचाऱ्यावर सिटीस्कॅन विभागाचा कारभार चालत होता. कोरोना काळात तर सिटीस्कॅन विभाग बंद राहत आहे, अशा तक्रारीही येत होत्या. जिल्हा रुग्णालयाने तक्रारीची दखल घेत या विभागात सद्यस्थितीत चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालयात एक बाहेर व एक आत अशा दोन सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी ८ ते दुपारी २ व दुपारी ४ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिटीस्कॅनची वेळ ठेवण्यात आल्याचेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
सिटीस्कॅन विभाग वेळेवर उघडेल
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सिटीस्कॅन करुन घेण्यासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. नातेवाईकांनी रुग्णाला आणतेवेळेस सोबत तज्ज्ञ डॉक्टरांचे पत्रही आणणे आवश्यक आहे, असेही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.