हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण; पाच रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:43+5:302021-01-02T04:25:43+5:30
रॅपिड अँटीजन टेस्ट कॅम्पमध्ये हिंगोली परिसर १०, वसमत परिसर १३, सेनगाव परिसर ५, औंढा परिसर १४, कळमनुरी ...
रॅपिड अँटीजन टेस्ट कॅम्पमध्ये हिंगोली परिसर १०, वसमत परिसर १३, सेनगाव परिसर ५, औंढा परिसर १४, कळमनुरी परिसर २३ असे एकूण ६५ रुग्ण आढळून आले आहेत. आरटीपीसीआरद्वारे आढळून आलेल्या रुग्णात हिंगोली परिसर २, सेनगाव परिसर २ दोन रुग्णांचा समावेश आहे.
१ जानेवारी रोजी ५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्डातील ४, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ३,५२० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३,४१८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजमितीस एकूण ४९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वॉर्ड जिल्हा सामान्य रुग्णालय येेथे भरती असलेल्या रुग्णांपैकी ३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे त्यांना ऑक्सिजन चालू आहे. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.