वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:40+5:302021-06-29T04:20:40+5:30
हिंगोली : वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई २८ जून ...
हिंगोली : वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई २८ जून रोजी सकाळच्या सुमारास खानापूर चित्ता ते कळमकोंडा रोडवर करण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता परिसरातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार २८ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कळमकोंडा ते खानापूर चित्ता परिसरात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमूख, पो.नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, सहाय्यक उप निरीक्षक बालाजी बोके, पोह संभाजी लेकूळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर सावंत, शेख जावेद, पायघन, ठाकरे आदींच्या पथकाने या भागात सापळा लावला. यावेळी चार ट्रॅक्टर येथून जात असल्याचे पथकाला दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविले असता त्यात वाळू आढळून आली. तसेच चालकांकडे कोणतीही परवनगी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी चार ब्रॉस वाळू व चार ट्रॅक्टरसह २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.ह. विठ्ठल कोळेकर यांच्या फिर्यादीवरून संतोष भाऊराव घुगे (रा. महादेववाडी), शिवाजी उर्फ बंटी सुभाषराव पतंगे (रा. टाकळी), संतोष भिकाजी नागरे (रा. खेड), प्रफुल पंजाबराव इंगळे (रा. टाकळी) यांच्या विरूद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास स.पो.नि. राजेश मलपिलू यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गव्हाणे करीत आहेत.
फोटो : २२