हिंगोली जिल्ह्यातील चौदा जणांना केले तडीपार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:39 PM2019-09-21T23:39:18+5:302019-09-21T23:39:40+5:30

कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच्या तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.

 Fourteen people in Hingoli district beat ... | हिंगोली जिल्ह्यातील चौदा जणांना केले तडीपार...

हिंगोली जिल्ह्यातील चौदा जणांना केले तडीपार...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच्या तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.
यामध्ये पप्पू उर्फ आसराजी सुरेश चव्हाण (रा. प्रवीणनगर हिंगोली), प्रवीण दिगंबर जाधव (रा.अकोला बायपास हिंगोली) यांना हिंगोली तालुक्यातून एक वर्षाकरिता तर संदेश बालासाहेब देशमुख (रा.सेनगाव) यांना उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली, सेनगाव तालुक्यातून एका वर्षाकरीता तर शेख जावेद शेख इस्माइल कुरेशी (रा. दर्गा मोहल्ला कुरूंदा), सय्यद गौस सय्यद मुनीर, शेख रफीक शेख बशीर (रा. कुरूंदा) यांना उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक वर्षाकरिता तसेच शेख खलील उर्फ फावडा शेख शब्बीर (रा. काजी मोहल्ला, कळमनुरी), शेख आसेफ शेख खलील (रा. इंदिरा नगर कळमनुरी), विजय शंकर कोकरे (रा. भोसी ता.कळमनुरी), शेख जमील शेख खलील, शेख अखील शेख खलील (रा. इंदिरा नगर, कळमनुरी), संतोष भिकू राठोड रा. भाटेगाव ता.कळमनुरी यांना कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत. यापुढेही हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आतापर्यंत पाठवलेल्या प्रस्तावापैकी राहिलेले ४० ते ५० इसमाविरूद्ध हिंगोली, वसमत व कळमनुरीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून सदर प्रस्तावावर लवकरच आदेश निर्गमित होणार आहेत.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडून आतापर्यंत म.पो.का. कलम ५६ प्रमाणे एकूण ७९ प्रस्ताव मपोका कलम ५७ प्रमाणे ९ प्रस्ताव तसेच कलम ५५ मपोका प्रमाणे एकूण ४ प्रस्ताव मागविले होते. सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी हिंगोली, वसमत व कळमनुरी यांच्याकडे हद्दपारीच्या शिफारशीसह प्रस्ताव पाठवले असता कळमनुरी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून ४ इसमांना तडीपार केले असून नवीन आदेशाने १४ इसमांना हद्दपार केले.

Web Title:  Fourteen people in Hingoli district beat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.