हिंगोलीत चौथा दिवस, वसमतलाही ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:40 AM2018-08-03T00:40:52+5:302018-08-03T00:41:15+5:30
२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : २ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मराठा आरक्षणासह विविध मागण्या तातडीने मान्य कराव्या आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनात माघार घेतली जाणार नाही, असे कळविले आहे.
हे धरणे आंदोलन बेमुदत असून ते साखळी पद्धतीने केले जाणार आहे. सदर धरणे आंदोलनाचे सर्कलनिहाय नियोजन केले आहे. या आंदोलनात महिलांही सहभाग होत आहेत.
सरकारचा निषेध
४हिंगोली शहरातील गांधी चौक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा फोटो ठेवून सरकारच्या नावाने जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. यामाध्यमातून अंबाबाई-तुळजाई मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे... असे साकडेही आंदोलकांनी घातले. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे.