मोफत सायकलचा निधी सोमवारी वर्ग होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:06 AM2018-11-23T00:06:01+5:302018-11-23T00:06:52+5:30
शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
मुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाºया निधीस तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजार रूपये निधी वर्ग करण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे हा निधी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू होती. अखेर उशिराने का होईना, निधी वर्गचे काम अंतिम टप्यात आले असून २६ नोव्हेंबर रोजी सदर रक्कम जमा केली जाणार आहे. सायकल वाटप योजनेतील निधी वर्गची कामे सुरू असून येत्या, सोमवारी रक्कम शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाकडून मानव विकासकडे लाभार्थी मुलींच्या याद्या वेळेत पोहोचत नाहीत. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांनी सदर याद्या जिल्हा कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास मुलींनाही शैक्षणिक कालावधीत योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु याकामी दिरंगाई होते, शिवाय नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींची पायपीट होऊन गैरसोय होते. वेळोवेळी याद्या सादर करण्याचे पत्रकही पाठविले जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
लाभार्थी मुलींना सायकल खरेदीसाठी ३ हजार ५०० रुपये रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते. सायकल खरेदी करण्यासाठी प्रथम लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. उर्वरीत १ हजार ५०० रुपए सायकल खरेदी केल्याची पावती दाखल केल्यानंतर बँकेत जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये हिंगोली ६६६, सेनगाव ६६६ तर औंढा नागनाथ ६२० एकूण १ हजार ९५२ लाभार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत.