मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:33 PM2018-10-21T23:33:02+5:302018-10-21T23:33:20+5:30

२१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 Free diagnosis and diagnosis of patients in the treatment camp | मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी

मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : २१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ. रामराव वडकुते, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, सुमित्रा टाले, अनिता सूर्यतळ, जावेदराज, माधव कोरडे, बालाजी घुगे, नाईक, मंदाडे उपस्थित होते. रोगनिदान व उपचार शिबीरात रक्तदाब, ब्लडशुगर असणाऱ्या रूग्णांची तपासणी करून मोफत उपचार केले. तसेच औषधीही वाटप केली. प्रास्ताविक डॉ. जयदीप देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांनी सामाजिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर डॉ. कदम यांनी विविध आजार व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. सत्यनारायण तापडीया, डॉ. संजय नाकाडे, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. लीला करपे, डॉ. सूर्यकांत घट्टे, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. यशवंत पवार, डॉ. किशन लखमावार, डॉ. अभिनव अग्रवाल, डॉ. गिरी, डॉ. टाले, डॉ. पोहरे, डॉ. जोगदंड आदी डॉक्टरांनी शिबीरात रूग्णांची तपासणी करून उपचार दिले.
मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीरात एकूण १२८१ रूग्णांची तपासणी व उपचार केले. आयोजित शिबीर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जयदीप देशमुख, डॉ. लक्ष्मण पठाडे, प्राचार्य संतोष विणकर, लोंढे, राकाँ शहराध्यक्ष जावेदराज व डॉक्टर सेलच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Free diagnosis and diagnosis of patients in the treatment camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.