गांधी चाैकात माेकाट जनावरांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:18+5:302021-01-18T04:27:18+5:30

शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. शेतशिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे अनेक ...

Free movement of animals in Gandhi Chaika | गांधी चाैकात माेकाट जनावरांचा मुक्तसंचार

गांधी चाैकात माेकाट जनावरांचा मुक्तसंचार

Next

शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. शेतशिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे अनेक शेतीकामांना खोंळबा हाेत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने हा वीजपुरवठा सुरळीतची मागणी शेतकऱ्यांतून हाेत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे अपघात वाढले

हिंगोली : शहरातील इंदिरा चौक, गांधी चौक, नांदेड नाका याठिकाणी अनेक वाहनचालक आपले वाहन बेशिस्तपणे व वेगाने धावत असल्याने अनेकदा याठिकाणी अपघात होत आहेत. यामुळे शहरातून बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पाेलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना ते सवना तांडा या दीड किमी रस्त्याचे काम रखडले आहेत. अनेक वाहनधारक या रस्त्यावरून वाहन चालविताना गिट्टीमुळे पडत असल्याच्या घटनाही घडत आहेत. यासाठी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

नाल्यातील पाणी रस्त्यावर साचले

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे नालीत न जाता रस्त्यावर साचत आहे. नालीचे व्यवस्थापन व्यवस्थित न केल्याने गावकऱ्यांचे सांडपाणी हे गावातील रस्त्यांवर साचत आहे. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे दुर्गंधीमय व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही पडू लागला आहे.

पीकविमा देण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील शेतकऱ्यांनी यंदा आपल्या खरीप हंगामातील पिकांचा पीकविमा ऑनलाइन भरला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे पीक वाहून गेले. याचा पीकविमा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पण गावातील अर्ध्याच शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला असून, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविमा मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बसस्थानकात धुळीचे वातावरण

सेनगाव : शहरातील बसस्थानक परिसरातील रस्ते व जमीन पूर्णपणे उखडलेली असल्यामुळे याठिाकणी नेहमी धूळ राहत आहे. अनेकदा बसस्थानकात रस्ते व्हावी, अशी मागणी करूनही बसस्थानक प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. बसस्थानकातील रस्ता कच्चा असल्यामुळे याठिकाणी धूळ उडत असून, याचा त्रास बसस्थानकातील प्रवाशांना होत आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ शेतशिवारामध्ये वन्य प्राणी घुसत आहे. अनेकदा रानडुकरांचा कळप, हरीण, रोही हे शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. तसेच शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना रानडुक्कर हल्ला करीत असल्याच्या घटनाही घडत आहे. यासाठी वनविभागाने लक्ष देऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Free movement of animals in Gandhi Chaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.