हिंगोलीत मोफत सोनोग्राफी तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:52 AM2018-02-12T00:52:59+5:302018-02-12T00:53:02+5:30
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
हिंगोली तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.सतीश रूणवाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी नियोजन करून खासगी सोनोग्राफी तज्ञ डॉ. पवार, डॉ. भरतीया, डॉ सो,टेहरे,डॉ. भाले यांनी सहकार्य करणार आहेत. सदर सुविधेसाठी प्रत्येक सोनोग्राफी बाबत तसा करार करून घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सदर मोफत तपासणी मोहिमेस ९ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
हिंगोली तालुक्यातून ४ प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ८४ गरोदर मातांना तपासणीसाठी पाठविल्याचे तालुका आरोग्याधिकारी रूणवाल यांनी सांगितले. प्रमाणे दर दमहिन्याला तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गरीब रूग्णांना दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातून या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. तसेच यामुळे माता व बालमृत्युला आळा बसेल, शिवाय गरोदर माता व बालमृत्यू दर आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांनी सदर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबीर घेऊन गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर गरोदर मातांना घ्यावयाची काळजी तसेच सकस आहारासंदर्भात माहित देण्यात आली. एवढेच काय तर गरोदर मातांची जिल्हा ठिकाणी जिल्हा सामान्य अथवा, खासगी रूग्णालयात मोफत सोनोग्राफीची सुविधा केली आहे. शिवाय सदरील महिलेस सोनोग्राफीसाठी आणल्यानंतर परत नेऊन सोडले जाणार आहे.