प्रत्येक शासकीय रुग्णालयात मोफत सोनोग्राफी, सिटीस्कॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:28+5:302021-09-21T04:32:28+5:30
जिल्ह रुग्णालयास रविवारी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे उपलब्ध ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, लस, औषधीसाठा याचा आढावा घेतला. यावेळी ...
जिल्ह रुग्णालयास रविवारी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे उपलब्ध ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, लस, औषधीसाठा याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे, विस्तार व माध्यम आधिकारी प्रशांत तुपकरी आदींची उपस्थिती उपस्थिती होती.
यावेळी टोपे म्हणाले की, राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन, तर उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन, डायलेसीस, सोनोग्राफी मशीन व इतर अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. राज्यातील आरोग्य विभागातील सर्व पदे भरली जाणार आहे. सध्या गट क व गट ड संवर्गातील पदे भरली जात आहेत. २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतल्या जाणार असून, त्या पारदर्शकपणे पार पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. एखाद्या जिल्ह्यात गैरप्रकार आढळून येत असल्याचे दिसून आल्यास तातडीने पोलीस कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
लसीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून कोविड चाचण्या वाढवाव्यात. दिवसातून किमान दोन हजार चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून लसीचे प्रमाण वाढवून दिले जात आहे. राज्याला दर महिन्याला तीन कोटी लसींची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्राकडे मागणी नोंदविण्यात आली असून, मागणीनुसार लस उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा महिला रुग्णालय व एमआरआय मशीनबाबतही त्यांनी या दोन्ही बाबी लवकरच उपलब्ध होतील, असे सांगितले.