‘आयुष्यमान’ अंतर्गत मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:01 AM2019-01-28T01:01:04+5:302019-01-28T01:02:02+5:30

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला

 Free treatment under 'Life' | ‘आयुष्यमान’ अंतर्गत मोफत उपचार

‘आयुष्यमान’ अंतर्गत मोफत उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या आरोग्य योजनेमुळे जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
गोरेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुबडे आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री कांबळे म्हणाले आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. योजने अंतर्गत १३०० हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार केले जातील. रुग्णांना हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये घेता येतील. या योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहण्याकरिता वेळीच निदान करुन घ्यावे. तसेच नागरिकांनी अपघात विमा काढून घ्यावा असेही आवाहन कांबळे यांनी केले. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्डचे वितरण करण्यात आले.

Web Title:  Free treatment under 'Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.