सिंचन अनुशेषातील कामे करण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:37 PM2018-05-25T23:37:31+5:302018-05-25T23:37:31+5:30
जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.
मुटकुळे यांनी जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा शासन दरबारी व राज्यपालांकडे चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर १५६९0 हेक्टरचा अनुशेष मंजूर झाला. शिवाय १७६ कोटींच्या कामांचा आराखडाही मंजूर झाला होता. मात्र ही कामे पुढील मंजुरीसाठी गोदावरी खोरे महामंडळामार्फत जलविज्ञान विभागाकडे गेल्यावर त्यांनी पाणी वापर उपलब्धता नसल्याचे सांगितले. आधीच २८ दलघमी एवढा जास्त पाणीवापर असल्याचे सांगितले. त्यामुळे नव्याने कामे करण्यास मंजुरी नाकारली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आ.मुटकुळे यांनी प्रस्तावित सापळी धरणासाठी आरक्षित २४0 दलघमीपैकी ६१ दलघमी पाण्याची उपलब्धता करून देण्यास मुख्य सचिवांची मान्यता मिळविली. त्यामुळे आता ही कामे होण्यातील अडथळा दूर झाल्याचे ते म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यात नदीवर १४ बंधारे असून २४ तलावांची कामे होणार आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनाचे महत्त्व पटल्याने त्यांनी जमिनी देण्यासही होकार दिला आहे. सिंचनाच्या क्षेत्रात अजूनही वाव असून ही कामे झाल्यावर पुढील रणनीती ठरविता येईल. मात्र सिंचनच्या प्रशासनाने यात एवढे दिवस अडथणे आणल्याने या कामांना विलंब होत असल्याचेही ते म्हणाले.