स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख यांचा शताब्दी पूर्तीनिमित्त शरद पवारांच्या हस्ते सन्मान

By प्रसाद आर्वीकर | Updated: January 22, 2025 18:27 IST2025-01-22T18:27:04+5:302025-01-22T18:27:48+5:30

हिंगोली शहराच्या जडण घडणीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे.

Freedom fighter Manikrao Deshmukh honored by Sharad Pawar on his centenary | स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख यांचा शताब्दी पूर्तीनिमित्त शरद पवारांच्या हस्ते सन्मान

स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख यांचा शताब्दी पूर्तीनिमित्त शरद पवारांच्या हस्ते सन्मान

हिंगोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख टाकळगव्हाणकर यांच्या शताब्दी पूर्तीनिमित्त २७ जानेवारी रोजी हिंगोलीत गौरव समारंभाचे आयोजन केले असून, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचञया हस्ते माणिकराव देशमुख यांचा गौरव केला जाणार आहे.

हिंगोली शहराच्या जडण घडणीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गौरव समारंभ आयोजित केला आहे. या सोहळ्याची शहरात जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता हिंगोली येथे हा सोहळा होत आहे.

शरद पवार यांचे २७ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी ११:३५ वाजता ते हेलिकॉप्टरने हिंगोलीत येतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता ते नर्सीकडे रवाना होती. येथे संत नामदेव महाराजांचे दर्शन घेऊन नर्सी नामदेव संस्थानला भेट दिल्यानंतर दुपारी २ वाजता ते हिंगोलीकडे जातील. येथे अकोला रोडवरील तिरुपतीनगर येथे आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या गौरव समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर शताब्दी गौरव समितीच्या माध्यमातून या सोहळ्याची शहरात तयारी केली जात आहे.

Web Title: Freedom fighter Manikrao Deshmukh honored by Sharad Pawar on his centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.