हिंगोली शहरातील रस्त्यांचा आराखडा समितीसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:25 AM2018-10-30T00:25:18+5:302018-10-30T00:25:37+5:30
शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे. २९ आॅक्टोबर रोजी शासनाचे याबाबत पत्र मिळाल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.
शहरात भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. शिवाय अनेक रस्त्यांची कामे होण्याची गरज आहे. त्यामुळे सुवर्णजयंती महानगरोत्थान योजनेत हिंगोली न.प.ने ५७ रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला प्रशासकीय मान्यता देण्यासह मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांनीही शिफारस केली आहे. या योजनेस औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने १0३.९0 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता दिली आहे. ही मान्यता २0१७ग१८ च्या राज्य दरसूचीवर आधारित आहे. यात राज्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना प्रथम प्राधान्य, इतर महत्त्वाचे द्वितीय रस्ते व शहरातील अंतर्गत रस्त्यांना शेवटचे प्राधान्य देण्याची संचालनालयाची शिफारस आहे.