ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:55 AM2018-07-06T00:55:30+5:302018-07-06T00:55:48+5:30

वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.

 Front of EPS pensioners | ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. यात शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडून खा.दिलीप गांधी यांना २९ मश २0१८ रोजी दिलेल्या पत्रात पेन्शनवाढीबाबात नकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे देशातील पेन्शनर्समध्ये असंतोषाची भावना असल्याचे निवेदनात म्हटले. तर कोशियारी कमेटीच्या शिफारसी लागू करणे अशक्य असल्याचेही सरकारने म्हटल्याने आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा दिसत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना तुटपुंजे व अपमानजनक वेतन मिळत आहे. याचा तीव्र निषेध करून डिसेंबर २0१८ पूर्वी नव्या मागण्यांनुसार पेन्शन मंजूर करण्याची मागणी केली. मागण्यांमध्ये किमान ९५00 रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, अंतिम वाढीसाठी कोशियारी समितीची शिफारस लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक्झेम्ट व नॉन एक्झेम्टचा भेदभाव न करता पेन्शन लागू करा, सर्वांच्याच आरोग्यासाठी ईएसआय योजना लागू करून ती अधिक सक्षम करावी, पेन्शन कम्युटेशन व आरओसी सुविधा पुन्हा प्रदान करा, जीवन प्रमाणपत्राची कार्यवाही स्थानिक बँक खात्यातून व्हावी, अशी मागणीही केली.
या निवेदनावर टी.के. टापरे, व्ही.टी. साठे, एस.के. रामावत, डी.ए. सिरसाठ, डी.पी. नरवाडे, एन.पी. घोडके, आर.आर. मुदिराज, के.एन. सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title:  Front of EPS pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.