पशुप्रेमींच्या वतीने मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:30 AM2018-04-03T00:30:28+5:302018-04-03T16:34:52+5:30
प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले.
सराकारने प्राण्यांवरील होणारे अत्याचार व कत्तल करणाºयांवर कायद्यात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. प्राणी रक्षण कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या तरीही, प्राण्यांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्रासपणे प्राण्यांची निर्दयपणे कत्तल सुरूच आहे. त्यामुळे या कायद्यात सुरधारणा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने पशुप्रेमी मोर्चात सहभागी झाले होते. निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवदेनावर अभयकुमार भरतीया, पंकज अग्रवाल, प्रशांत सोनी, शरद सोवितकर, प्रदीप दोडल, राजेश बियाणी, काबरा, अनिल पठाडे, चंद्रशेखर कान्हेड यांच्यासह पशुप्रेमींच्या स्वाक्षºया आहेत.
तर मोर्चामध्ये उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, रमेशचंद्र बगडिया, आखरे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.