इंधनासाठी २१ गावांना निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:18 AM2018-05-08T00:18:04+5:302018-05-08T00:18:04+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.
वॉटरकप स्पर्धा २२ मेपर्यंत राहणार आहे. जलसंधारणाची कामे जेसीबी मशीनद्वारे होत आहे. मशिनीला लागणाºया इंधनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील कवडा बिबथर, सिंदगी, कांडली, बाभळी, शेनोडी, भुरक्याची वाडी, खापरखेडा, चिंचोर्डी, वारंगा तर्फे नांदापूर, निमटोक, रेणापूर, हिवरा, येडशी, येडशी तांडा, पार्डी, कळमकोंडा, असोलवाडी, गोर्लेगाव, बोल्डावाडी, रुपूर या २१ गावाना प्रत्येकी ७५ हजार प्रमाणे १५ लाख ७५ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. स्पर्धेतील गावांचा उत्साह टिकावा व जास्तीत जास्त गावे जलपरिपूर्ण व्हावीत, यासाठी स्पर्धेत सहभागी गावांना इंधनासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देण्यात येत आहेत.
लोकसहभागातून झालेल्या व मशिनद्वारे झालेल्या कामांचा लेखाजोखा ग्रामपंचायतने ठेवावा, मिळालेल्या निधीची माहिती ग्रामसभेत द्यावी लागणार आहे. धनादेशाद्वारेही रक्कम ग्रामपंचायतींना द्यावी लागणार आहे. इंधनासाठीच्या कामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत तहसील कार्यालयास प्राप्त होताच १०० टक्के निधी वितरीत करण्यात येणार आहे. कामाच्या मोजमापाचा अहवालही तांत्रिक अधिकाºयांमार्फत प्रशासनाला द्यावा लागणार आहे. यापुर्वी रामवाडी, मसोड, जरोडा या तीन गावांना प्रत्येकी ७५ हजाराचा निधी इंधनासाठी देण्यात आला आहे. सध्या कळमनुरी तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये लोकसहभागातून कामे जोमात सुरू आहेत. अनेक ठिकाणी लग्नसराईचा परिणाम होत असून काही ठिकाणी यावर मात करून ग्रामस्थ लढा देत असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळविण्यासाठी एकजूट दाखवत काही गावांनी वाखाणण्याजोगे काम केले आहे. अशा गावांचा या कामांमुळेच फायदा होणार आहे.