हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन
By विजय पाटील | Published: June 20, 2023 02:40 PM2023-06-20T14:40:48+5:302023-06-20T14:41:02+5:30
हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आले आंदोलन
हिंगोली : शिवसेनेतून फुटून बाहेर पडणाऱ्या शिंदे सेनेला २० जून रोजी वर्ष पूर्ण झाले आहे. त्याविरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त गद्दार दिवस हे आंदोलन करण्यात आले.
हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बी.डी. बांगर, सुजय देशमुख, स्वप्नील इंगळे, उमेश देशमुख, शेख एजाज, अमित कळासरे, कमलेश यादव, विशाल खंदारे, ईश्वर उरेवार, प्रफुल्ल सोनवणे, संतोष साबळे, सुरज वडकुते, अक्षय डाखोरे, तेजस पवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी ५० खोके एकदम ओके, आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी, महाराष्ट्र त्रस्त, खोके घेवून गद्दार मस्त अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
औढा नागनाथ येथे या आंदोलनात
बाबासाहेब गायकवाड, संजय दराडे, प्रवीन टोम्पे, गोपाळ मगर, अनंत सांगळे, बबन कदम, सुभाष सांगळे, पंडित चेअरमन, सारंग नागरे, अमोल गीते आदी सहभागी झाले होते.
सेनगाव येथील आंदोलनात रायुकाँ जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे, वैशालीताई वाघ, अशोक फासाटे, निखिल देशमुख, अमोल म्हस्के, रावसाहेब गडदे आदी सहभागी झाले होते.
बाळापुरातही आंदोलन
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे महाविकास आघाडी कडून २० जून हा "गद्दार दिवस" म्हणून साजरा करण्यात आला यावेळी बाबूराव वानखेडे, डी. के. दुर्गे, डॉ. वसंतराव पतंगे, शिवाजी शिंदे पुयनेकर, डॉ. संतोष बोंढारे, सोपान बोंढारे, अभिजित देशमुख, बालाजी बोंढारे, डॉ. सूर्यवंशी, सुशील बोंढारे, बालाजी जाधव, गुफ्रांन कुरेशी, अमीन कादरी, शेख जहीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वसमत येथे घोषणाबाजी
वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिवस आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत बागल, त्र्यंबकराव कदम, तानाजी बेंडे, राजा कदम, आशीर्वाद इंगोले, मनोज भालेराव, प्रशांत शिंदे, वेदांत जाधव, साई पडोळे, मंगेश बांगर, सरकटे आदी उपस्थित होते.