कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे ठेवली जातेय नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:19 AM2021-07-12T04:19:08+5:302021-07-12T04:19:08+5:30

हिंगोली: समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घ्या. तुमच्यासोबत ...

Garbage dumpers are monitored by CCTV | कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे ठेवली जातेय नजर

कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे ठेवली जातेय नजर

Next

हिंगोली: समृद्ध भारताच्या निर्माणामध्ये पहिले पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घ्या. तुमच्यासोबत नगर परिषद असून सोबतीला स्वच्छता कामगारही आहेत. पण हेही लक्षात ठेवा यापुढे कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे नजर ठेवल्या जाणार आहे.

नगर परिषद मार्फत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत असून प्रत्येक प्रभागात तसेच व्यापारी क्षेत्रांमध्ये दिवसातून दोन वेळेस स्वच्छता केली जाते. कचरा संकलन करण्याकरिता नगर परिषदेने घंटागाडीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. सदर संकलन केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, शहरात कचरा फेकण्यात येणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. यामुळे कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवता येईल. जेणेकरून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड किंवा फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई न.प. कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांंच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक पेंटिंग्ज, पथनाट्ये, पोस्टर्स, बॅनर्स आदींमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. हिंगोली शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याकरिता वेळोवेळी प्लॅस्टिक वेचा मोहीम, प्लॅस्टिक बंदी मोहीम ही विविध बचत गट, सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविली आहे. श्रमदान, सायकल रॅली, पायदळ रॅली, नदी तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली आहे.

शहरातील १६ प्रभागातील कचरा संकलन करण्याकरिता रहिवासी क्षेत्रात व व्यापारी क्षेत्रात एकूण २० घंटागाडी, ३ टिप्पर आणि ३ ट्रॅक्टर कार्यरत केलेले आहेत.

हिंगोली शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याकरीता न.प. कार्यालयामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्वच्छता ॲपवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जेणेकरून स्वच्छतेसंबंधी येणाऱ्या तक्रारीची लगेच दखल घेऊन त्याचे निवारणही केले जाते.

स्वच्छतेची दैनंदिन कामे करण्याकरिता कायमस्वरूपी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचारी मिळून एकूण १५५ स्वच्छता कर्मचारी आजमितीस कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याकरिता आणि शहरात रोगराईचा प्रसार होऊ नये म्हणून ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे. तसेच डेंगू व मलेरियासारख्या रोगांपासून वाचविण्याकरिता फॉगिंग मशीनद्वारे आठवड्यातून दोन वेळा शहरात फवारणी केली जाते.

प्रतिक्रिया...

सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने संपूर्ण शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी जेसीबी मशीनद्वारे साफसफाई युद्धपातळीवर केली आहे. अनेक ठिकाणी केल्याही जात आहे. दैनंदिन स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे नियोजन केले जात आहे. संकलन केलेल्या संपूर्ण कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. शहरातील स्वच्छताकरिता वार्षिक अंदाजे ४ ते ५ कोटी खर्च केला जातो. नागरिकांनी नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांना सहकार्य करुन त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे. जेणेकरुन त्यांना स्वच्छता करताना हुरूप मिळेल. १२ जुलै रोजी जागतिक स्वच्छता दिन असून या निमित्त स्वच्छता कामगारांचा न.प.च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

-बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक

Web Title: Garbage dumpers are monitored by CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.