वर्षभरात गॅस सिलिंडर २५ रुपयांनी वाढले; सबसिडी एकदाची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:21+5:302021-07-16T04:21:21+5:30

महागाईमुळे किराणा, भाजीपाल्यासोबत घरगुती सिलिंडरचे दरही वाढले आहेत. ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी जळतण तरी मिळते. शहराच्या ठिकाणी जळतणही मिळत ...

Gas cylinders increased by Rs 25 during the year; Subsidy once closed | वर्षभरात गॅस सिलिंडर २५ रुपयांनी वाढले; सबसिडी एकदाची बंद

वर्षभरात गॅस सिलिंडर २५ रुपयांनी वाढले; सबसिडी एकदाची बंद

Next

महागाईमुळे किराणा, भाजीपाल्यासोबत घरगुती सिलिंडरचे दरही वाढले आहेत. ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी जळतण तरी मिळते. शहराच्या ठिकाणी जळतणही मिळत नाही. सिलिंडर संपले की काही दिवस विजेच्या शेगडीवर सणावाराचा स्वयंपाक करावा लागत असल्याचे गृहिणींनी सांगितले.

शहरात चूलही पेटविता येत नाही...

ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणे काही वाटत नाही. कारण जळतण मिळणे सोयीचे असते. ग्रामीण भागात सर्रासपणे चुलीवर दोन्ही वेळेस स्वयंपाक केला जातो. परंतु, शहराच्या ठिकाणी जळतण मिळत नाही. धुरामुळे घराचे छत खराब होऊन बसते.

- प्राची हरिष पुंडगे, गृहिणी

सद्य:स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. गॅस संपला की चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मध्यंतरी शंभर ते दीडशे सबसीडी मिळायची. परंतु, आता शासनाने सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे घराचा गाडा कसा हाकावा हा यक्ष प्रश्रच आहे.

- सविता बांगर, गृहिणी

Web Title: Gas cylinders increased by Rs 25 during the year; Subsidy once closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.