३0 जूनपर्यंत पीककर्ज वाटप उद्दिष्ट गाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:03 AM2018-06-22T01:03:47+5:302018-06-22T01:03:47+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.
भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अग्रणी बँकेच्या वतीने आढावा सादर करण्यात आला. त्यात एकाही बँकेच्या कर्जवाटपाची स्थिती सुधारत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात ऐन पेरणीच्या तोंडावर ९४0२ शेतकºयांना केवळ ४७.५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याने हे चांगले चित्र नसल्याचे सांगून त्यांनी बँक अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. यावेळी ज्या बँकांचे कर्जवाटप कमी आहे, अशांना मुद्दाम बोलावण्यात आले होते. तर जूनअखेर हे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तर कर्जमाफी वाटप व कर्जमाफीतील सभासदांना नवीन कर्जवाटप याचा आढावाही भंडारी यांनी घेतला. त्यात ४७४५ जणांना १७.१३ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले.
पीककर्जाव्यतिरिक्त विविध योजनांत करायच्या वाटपाचा आकडाही समाधानकारक नसल्याचे आढाव्यात समोर आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर या कर्जवाटपात गती येईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र एकूण ९ हजारांपैकी अर्ध्या शेतकºयांना जर कर्जमाफीनंतर कर्ज दिल्याचे बँका सांगत असतील तर नियमित खातेदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना बँका नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी अशा ग्राहकांनाही कर्ज दिले जात नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे.