हिंगोली जिल्हा कचेरीच्या कामालाच वाळू मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:52 PM2017-12-04T23:52:01+5:302017-12-04T23:52:06+5:30
जिल्ह्यात सध्या वाळू मिळत नसल्याने शासकीय व खाजगी कामेही ठप्प झाली आहेत. खुद्द जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच जीर्ण विटा अन् मातीमिश्रीत वाळूद्वारे काम करण्याची वेळ कंत्राटदारावर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सध्या वाळू मिळत नसल्याने शासकीय व खाजगी कामेही ठप्प झाली आहेत. खुद्द जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच जीर्ण विटा अन् मातीमिश्रीत वाळूद्वारे काम करण्याची वेळ कंत्राटदारावर आली आहे.
जिल्ह्यात पूर्णा, पैनगंगा नदीतून मिळणारी वाळू चांगली असते. इतरत्रच्या घाटांवर वाळू कमी आणि मातीच अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अशा ठिकाणची वाळू वापरणे म्हणजे बांधकामाच्या दर्जाला मूठमाती देण्यासारखेच आहे. नांदेड, परभणीहून वाळू मागविलीच तर ती ६ ते ८ हजार रुपये ब्रासने खरेदी करावी लागत आहे. ती सामान्यांच्या तर आवाक्यातच राहिली नाही. शासकीय कामांतही वाळूचे एवढे दर मिळत नाहीत. त्यामुळे गुत्तेदारांनाही ती परवडत नाही. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकाºयांचे दालनच या कचाट्यात सापडले आहे.
दुसरीकडे ज्या घाटांचे लिलाव झाले त्यांचीही रक्कम भरली जात नसल्याने ते चार घाटही अधांतरीच लटकले असून उर्वरित १९ घाटांसाठी फेरनिविदा निघाली आहे. हे घाट कधी सुरू होतील, हा प्रश्नच आहे.